फेब्रुअरी २०२५
संपादक मंडळ, ‘एकोपा,’
फेब्रुवारी २०२५ च्या अंकातील प्रियदर्शन मनोहर यांचा संगीत नाटकांच्या ‘नांदी’ वरील लेख, तसेच ‘चंद्रधनू’ बद्दलचा वीणा शाह यांचा अनुभव आणि माहिती छान, मनोरंजक वाटली.
श्री. नटवर गांधी यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे. त्यांच्यासारख्या आणखी काही भारतीय वंशाच्या व्यक्ती असू शकतील परंतु आपल्याला माहिती नसल्यामुळे त्यांचे काम प्रकाशात आले नसावे. तुमच्या मुलाखतीद्वारे श्री. नटवर गांधी यांची माहिती कळली.
धन्यवाद.
प्रमोद तेंडुलकर, फ्रेमॉण्ट, कॅलिफोर्निया
आधीच्या एकोपा अंकांप्रमाणेच फेब्रुअरी २०२५चा अंकही अतिशय वाचनीय आहे. मला तो आवडला. तुमच्या संपादनाखाली पुढचे सर्व अंकही असेच दर्जेदार निघतील याची खात्री वाटते.
नटवर गांधी यांच्याशी तुम्ही केलेला संवाद वाचला. त्यांनी अमेरिकेविषयी दिलेली कबुली आवडली.
मला नेहमी असे वाटते की दुसरे महायुद्ध संपल्यावर अमेरिका जगाचा नैतिक पोलिस असल्यासारखी वागते आहे.
नटवर गांधींच्या गुजराती कविता देवनागरीत छापल्या असत्या तर त्या माझ्यासारख्या अनभिज्ञ वाचकाला वाचतां आल्या असत्या.
तुमचे ‘एकोपा’चे सत्कार्य असेच पुढे चालू राहो.
ले. क. दिवाकर पुरोहित, पुणे